। पेण । प्रतिननिधी ।
रावे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मोराकोटा या शाळेच्या शिक्षिका जयश्री म्हात्रे या स्वताः होडी खाडीत ढकलून खाडीपार करुन नियमितपणे ज्ञानदान करीत आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आपला प्रयत्न असतो,असे म्हात्रे यांचे म्हणणे आहे.
पेण तालुक्यात अनेक शाळा अशा आहेत की, त्या शाळांमध्ये जाण्यासाठी एक तर पायी अथवा होडीने जावे लागते. जुलै 2021 मध्ये गवळावाडीच्या शिक्षकांनी आम्हाला शाळेमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही. असे सांगून सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्या शिक्षकांचे पितळ उघडे पडले. कारण गवळावाडीला जाण्यासाठी चांगल्याप्रकारेचा रस्ता होता. मात्र चुकीची माहिती प्रसार माध्यमांना देउन सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तर काही शिक्षक असेही आहेत की, ज्यांना खरच आपल्या शाळांवर जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यांना होडीने खाडीपार करुन नंतर पायपीट करत शाळेपर्यंत पोहचावे लागते. म्हात्रे यांना तर भरती ओहोटीच्या प्रमाणे कधीकधी तर चिखलातून पायपीट करावी लागते. आणि पावसाळयात तर विचार न करणेच बरे असे असताना ही प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन म्हात्रे या कोरोनाच्या काळातही शाळेत पोहचत असत. आणि आत्ता जेव्हापासून नियमित शाळा सुरु झाली आहे. तेव्हापासून दररोज शाळामध्ये 10 वाजण्याच्या आत हजर होत आहेत. त्यांच्या या विद्यार्थ्यांबाबत असलेल्या तळमळीमुळे मोराकोटा गावातील ग्रामस्थ देखील खुश आहेत. एकीकडे रस्ता असताना देखील रस्ता नाही अशा सांगणार्या गवळावाडीच्या शिक्षिका कुठे तर दुसरीकडे खाडीतुन होडीने प्रवास करुन शाळेत पोहचणार्या जयश्री म्हात्रे सारख्या शिक्षिका कुठे या दोन्ही शिक्षिकांचा विचार करता आपल्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिकुल परिस्थितीवर मात करत शाळेत पोहचणार्या जयश्री म्हात्रे क्वचितच त्यांच्या या आपल्या पेशाबाबत प्रामाणिकतेसाठी सर्व स्तरातून कौतुक होत आहेत.






