एक्सप्रेसवेवर टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात, टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू

। खोपोली । प्रतिनीधी ।
मुंबई -पुणे एक्सप्रेसवेवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. मुंबई -पुणे एक्सप्रेसवेवर शनिवारी (दि.१८ जून) पहाटेच्या वेळेत कोंबड्यावाहू टेम्पोने समोरील ट्रकला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला.


मिळालेल्या माहितीनुसार कोंबड्या वाहून टेम्पोची समोरील ट्रकला धडक दिल्यामुळे टेम्पोचा समोरील भागाचा चक्काचूर मोठे नुकसान झाले असून टेम्पो चालक नयूम दुस्तीगीर शेख (वय 41 रा उस्मानाबाद) आतमध्ये अटकून पडल्याने जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त टीम, देवदूत, आयबीचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून चालकाला बाहेर काढून त्याचा मृत्यूदेह खोपोली पालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात आणला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी खालापूर प्राथमिक रुग्णालयात पाठविण्यात आले.


तर, मुंबईच्या दिशेने 41 किलोमीटरच्या पुढे वेगवेगळ्या ठिकाणी दोन कंटेनर उलटल्याने मुंबई दिशेला वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतु यंत्रणांनी तातडीने उलटलेले कंटेनर बाजूला केल्यावर एक तासाने एक्सप्रेसवेवर वाहतूक सुरळीत झाली.

Exit mobile version