| कर्नाटक | वृत्तसंस्था |
कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. यल्लापूर तालुक्यातील गुळ्ळापुर नजीक भाजीपाल्याने भरलेला ट्रक पलटी होऊन भीषण अपघाताची घटना घडली. या दुर्घटनेत ट्रकमधील 10 जण ठार झाले असून, घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कन्नड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गवर बुधवारी (दि. 22) रोजी सकाळी ही दुर्घटना घडली आहे. भाजीपाल्यांनी भरलेल्या लॉरीतून 25 जण प्रवास करत होते. गुळ्ळापुरजवळील घट्टा परिसरात ही लॉरी पलटल्यानंतर लॉरीतून प्रवास करणाऱ्या 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, ट्रकमधील इतर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिका व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, मृत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.