| वर्धा | प्रतिनिधी |
नागपूर येथून वर्ध्याकडे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला. वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या तीन मित्रांचा अपघाती मत्यू झाला असून, अन्य एक मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पहाटे तुळजापूर – नागपूर मार्गावर सेलू येथे धानोली फाट्यावर घडली आहे.
वर्धा नागपूर रस्त्यावरून सेलू बायपास परिसरात त्यांच्या कारला अपघात झाला भरधाव कार पलटी झाल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. वर्ध्या येथील रहिवासी असलेले चारही जण गुरुवारी (दि.13) रोजी पार्टी करण्यासाठी नागपूरला गेले होते पार्टी झाल्यानंतर रात्री उशिरा चारही जण वर्ध्याच्या दिशेने येत होते वर्ध्या नागपूर रस्त्यावरील सेलू बायपास रोडवर त्याच्या कारला अपघात झाला. कार चार ते पाच वेळा पलटी झाली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाच रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. कार वरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मृतकांमध्ये सुशील म्हस्के, शुभम कवडू मेश्राम, समीर सुटे यांचा समावेश आहे. तर जखमी युवकाचे नाव धनराज धबर्डे असे आहे. सेलू पोलीस पुढील आहेत.