| पनवेल | प्रतिनिधी |
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने तालुक्यातील चिंध्रण येथे आमरण उपोषणाला बसलेल्या भूमिपुत्रांना पाठिंबा दिला आहे. तळोजा एमआयडीसीच्या विस्ताराकरीता चिंध्रण व लगतच्या गावांचे भुसंपादन करण्यात येत आहे. त्याकरीता अदानी समुह शेतकऱ्यांची जमीन कवडीमोलाने खरेदी करत असुन बाजारमुल्य व योग्य मोबदला न देता शेतकऱ्यांची फसवणुक करत असल्याने त्या विरोधात चिंध्रण, कानपोली व महालुंगी ग्रामस्थ तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गेले 5 दिवसांपासुन आमरण उपोषण करण्यात येत आहे. नागरीक मोठ्या संख्येने न्याय हक्कासाठी या उपोषणास बसले असून या उपोषणाला शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्यावतीने जिल्हाप्रमुख शिरीष घरत, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, शिवसेना महानगरप्रमुख अवचित राऊत, समन्वयक दिपक घरत आदी उपस्थित होते.







