ठाकरे, सामंत 30 मार्चला लोणेरेत

। अलिबाग । प्रतिनिधी ।
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत हे बुधवारी 30 मार्चला लोणेरे येथे येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी 3 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परिसरात इक्युबेशन सेंटर व पदव्युत्तर संशोधन केंद्र इमारतीचे भूमिपूजन तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी 4.15 वाजता मेहता कॉमर्स कॉलेज, माणगाव येथे होणार्‍या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version