। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यातील समाधान चौक परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात मनपाचा एक ट्रक मागे येत असताना अचानक रस्त्याला मोठा खड्डा पडला. हा खड्डा हळहळू इतका खोल होत गेला की, संपूर्ण ट्रक त्यामध्ये फसला आहे. हि घटना शुक्रवारी (दि. 20) सव्वाचारच्या सुमारास घडली आहे. विशेष म्हणजे ट्रकसह आणखी दोन गाड्यादेखील त्या खड्ड्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत ट्रकचालकाने प्रसंगावधान साधत थेट ट्रकमधून उडी मारत स्वत:चा जीव वाचवला.
या घटनेनंतर तातडीने अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशामक दलाच्या जवानांकडून ट्रक बाहेर काढण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच, अचानकपणे हा खड्डा नेमका पडला कसा? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.