आ.जयंत पाटील यांचे प्रतिपादन
| अलिबाग | प्रतिनिधी |
विकासकामांच्या माध्यमातून वेश्वी गाव आणि परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचा शेकापचा नेहमीच प्रयत्न राहिला असून,भविष्यातही तीच भूमिका घेऊन आम्ही काम करणार आहोत,असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यानी केले.
वेश्वी,वाडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा प्रारंभ आ.जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी त्यांनी उपस्थितांसमोर संवाद साधला.यावेळी जयंत पाटील यांच्या हस्ते नेहुली येथील गणेश विसर्जन घाटाचे नुतनीकरण,वाडगाव येथे सार्वजनिक व्यायामशाळेचे उद्धाटन तसेच वेश्वी येथेही सार्वजनिक व्यायामाशाळेचे उद्धाटनाबरोबर ओमकार क्रीडा मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर माजी जि.प.सदस्या चित्रा पाटील,सरपंच प्रफुल्ल पाटील,माजी सरपंच आरती पाटील,पं.स.माजी उपसभापती मीनल माळी,माजी सदस्य रचना पाटील,वेश्वीचे उपसरपंच नंदकुमार कदम,चेंढरे ग्रा.पं.सदस्य अजित माळी,माजी उपसरपंच नरेश पडियार, अरुण पाटील, सुनील गुरव,सुरेंद्र शेळके,सदानंद शेळके,गजानन नाईक,राघव गुरव,मधूकर थळे,सुनील गुरव,अनंत मुळुस्कर यशवंत पाटील,रविद्र पाटील,नाशिकेत कावजी,विष्णू मगर,महादेव जाधव,संदीप घरत आदी मान्यवर उपस्थित होते.
आ.जयंत पाटील यांनी आपल्या छोटेखानी भाषणातून प्रफुल्ल पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे कौतूक केले.आमदारकीच्या काळात वेश्वीतील विविध विकासकामांसाठी आतापर्यंत साडे तीन कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.यातून विविध मुलभूत विकासकामे दर्जेदार पद्धतीने करण्यात वेश्वी ग्रामपंचायत यशस्वी झाल्याबद्दल जयंत पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
अलिबागेत आता सात मजली इमारत
अलिबाग शहरासाठी सरकारकडून 2 एफएसआय मंजूर करण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत.त्यामुळे अलिबागसारख्या ठिकाणी आता कुणालाही सात मजल्यापर्यंत इमारती बांधणे शक्य होणार आहे. वाढते नागरीकरण लक्षात घेता आता नागरिकांचा ओढा वेश्वी,चेंढरे या ग्रामपंचातीच्या हद्दीत येण्याची शक्यता असल्याने तेथे येणार्या नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यावर ग्रामपंचायतीने लक्ष केंद्रीत करावे,असे त्यानी सुचित केले.नव्या पिढीनेही असेच दर्जेदार कामे करावीत,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.प्रफुल्ल पाटील यानी सर्वाचे स्वागत केले.
अलिबाग-विरार कॉरिडॉर पूर्ण झाल्यावर त्याचा मोठा फायदा अलिबाग तालुक्याला होणार आहे.यासाठी त्याचे नियोजन आतापासूनच करावे. – जयंत पाटील,आमदार