। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आगामी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत एकदिवसीय स्वरूपात खेळल्या जाणार्या आयसीसी अजिंक्यपद चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. यासाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार की नाही? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तत्पूर्वी कानपूरमध्ये बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या दुसर्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाच्या पार्श्वभूमीवर राजीव शुक्ला यांनी पत्रकारांना सांगितले की, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आंतरराष्ट्रीय दौर्यांसाठी नेहमीच सरकारची परवानगी घेण्याचे आमचे धोरण आहे. आमच्या संघाने कोणत्याही देशाचा दौरा करायचा की नाही? हे सरकार ठरवते. या बाबतीतही सरकार जो काही निर्णय घेईल, आम्ही त्याचे पालन करू.