बंडखोरांना धक्का! विलिनीकरण अथवा नवा पक्ष करावा लागणार स्थापन?

। मुंबई । प्रतिनिधी ।
सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा शिवसेनेने शिंदे सरकारविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू झाली आहे. सत्तासंघर्षात राज्यपालांची भूमिका होती असा दावा सिब्बल यांनी केला आहे. तसेच बंडखोरांना नवा पक्ष स्थापन करावा लागेल अन्यथा दुसर्‍या पक्षात विलिन व्हावे लागेल, असे सांगितले आहे.

सिब्बल यांनी केलेल्या युक्तीवादात त्यांनी म्हटले कि, 2 तृतीयांश सदस्य पक्षावर दावा करु शकत नाहीत. बंडखोरांनी मुळ पक्षाचा व्हिप मोडला. पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन केले. याशिवाय बंडखोरांनी पक्षाचे अधिकृत अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांना मान्य केल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून मान्य करावेच लागेल. व्हिप दुवा म्हणून कार्य करतो. मात्र बंडखोरांनी व्हिप मोडला. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी सिब्बल यांनी केली आहे. या युक्तीवादानंतर न्यायालय याबाबत काय सुनावणी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version