| मुंबई | प्रतिनिधी |
“भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत 20 षटकअखेर 9 गडी बाद 247 धावा केल्या. भारतीय संघाकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 135 धावांची खेळी केली. दरम्यान धावांचा डोंगर उभारताच भारतीय संघाने इतिहासाला गवसणी घातली आहे. भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने मैदानाच्या चारही बाजूंना फटकेबाजी करत 7 चौकार आणि 13 षटकारांच्या मदतीने 54 चेंडूत 135 धावांची खेळी केली. या खेळीसह तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वात मोठी खेळी करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. यासह त्याच्याकडे टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम मोडण्याचीही संधी होती. भारताचा माजी टी-20 कर्णधार रोहित शर्मा या यादीत अव्वल स्थानी आहे. रोहितने अवघ्या 35 चेंडूत टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक पूर्ण केलं होतं. अभिषेक शर्माला हा विक्रम मोडण्याची संधी होती. मात्र त्याने 37 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. यासह तो सर्वात वेगवान शतक पूर्ण करणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरा, तर भारताचा दुसराच फलंदाज ठरला आहे.
भारतीय संघाची सर्वोच्च धावसंख्या
297-6 विरुद्ध बांगलादेश, 2024283 -1 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2024247-9 विरुद्ध इंग्लंड, 2025 भारतीय संघाने या सामन्यात फलंदाजी करताना धावांसह रेकॉर्ड्सचाही पाऊस पाडला आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत भारतीय संघाने टी-20 क्रिकेटमधील तिसरा सर्वाच्च स्कोअर उभारला आहे. यापूर्वी कुठल्याही संघाला इंग्लंडविरुद्ध खेळताना इतका मोठा स्कोअर करता आला नव्हता.
पावरप्लेमध्ये फलंदाजी करताना भारतीय संघाची सर्वोच्च धावसंख्या
95-1 विरुद्ध इंग्लंड, 202582-2 विरुद्ध स्कॉटलँड, 202182-1 विरुद्ध बांग्लादेश, 202478-2 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2018.