| नाशिक | प्रतिनिधी |
शिर्डीमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. शिर्डी साई संस्थानच्या तीन कर्मचाऱ्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञातांकडून चाकू हल्ला करण्यात आला आहे. यात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून तिसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे हे कर्मचारी शहरातील वेगवेगळ्या भागांतून कामावर निघाले होते, त्यावेळी अज्ञांतानी हा हल्ला केला. यात दोघे ठार झाले. तर तिसरा कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या दुहेरी हत्याकांडाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तर हल्ला झालेला तिसरा इसम हा खासगी कर्मचारी होता. तो देखील ड्यूटीवर जात होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर लोणीच्या प्रवारा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.