रोहा तालुक्यातील फिरता दवाखाना गरीबांसाठी ठरतोय देवदुत

। सुकेळी । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील नागोठणे जवळच असलेल्या ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये जवळ-जवळ 17 वर्षांपासून गोरगरीबांच्या सेवेसाठी कार्यान्वित असलेल्या बी.सी.जिंदाल चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये अंत्यंत माफक दरात ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमधिल तसेच आजुबाजुच्या परिसरातील रुग्ण चांगल्या पद्धतीत उपचार घेत आहेत. तसेच सध्याच्या महागाईच्या दृष्टिकोनातून नागरिकांना किरकोळ आजारासाठी हॉस्पिटलचा खर्च न परडण्यासारखा असल्यामुळे त्याचप्रमाणे जनतेचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी जिंदाल कंपनीचे चेअरमन डी.पी.जिंदाल यांच्या प्रयत्नातून फिरता दवाखाना सुरू करण्यात आला. आणी हाच फिरता दवाखाना अनेक गोरगरीबांसाठी देवदुत ठरत आहे.

या फिरत्या दवाखान्यामार्फंत अनेक गरीब रुग्णांना यांचा लाभ मिळत आहे. या फिरत्या दवाखान्याची सेवा ही ऐनघर विभागातील सुकेळी, खैरवाडी, वेताळवाडी, ऐनघर, हेदवली, तामसोली, बाळसई, गोडसई, पाटणसई आदिवासी वाडी, वजरोली खांब विभागातील घेरासुरगड, वैजनाथ, ऐनवहाळ, डोलवहाळ, मढाळी आदिवासी वाडी, मुठवली, चिल्हे, तळवली, नडवळी त्याचप्रमाणे सुधागड तालुक्यातील बळाप, राबगाव आदिवासी वाडीवरील रुग्ण या मोफत सेवेचा लाभ घेत आहेत.

जिंदाल रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. जयरमण नडार यांच्या मार्गदर्शनाखाली जिंदाल हॉस्पिटलमधील डॉक्टर फिरत्या दवाखान्याची सेवा देत आहेत. या फिरत्या दवाखान्याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटल व्यवस्थापनाने केले आहे.

Exit mobile version