| कर्जत | प्रतिनिधी |
शाळा, कॉलेजांमधील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या चार-पाच दिवसात विद्यार्थी खूप धमाल करतात. त्यानंतर मात्र सर्वजण अभ्यासाला लागतात. मीसुद्धा एक विद्यार्थिनी आहे. त्यामुळे स्नेहसंमेलन आमच्या शाळेतही होत असते. यामध्ये सर्वात बोअर म्हणजे प्रमुख पाहुण्यांचे भाषण. मी जरी आज प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित असले तरी भाषण करून मी तुम्हाला मुळीच बोअर करणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन आघाडीची बालकलाकार खुशी हजारे हिने केले.
कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाच्या फार्म फियेस्टा वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सिने सृष्टीतील बालकलाकार खुशी हजारे हिच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राधाई कन्स्ट्रक्शनचे भूषण भोईर, प्रा. डॉ. मोहन काळे, उपप्राचार्य डॉ. अमोल चांदेकर, डॉ. निलोफर खान, सचिन हजारे, अर्चना काळे आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. काळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. त्यानंतर विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
याप्रसंगी डॉ. उज्वला ठुबे, डॉ. स्वप्नील पालक, डॉ. अतुल त्रिपाठी, डॉ. सतीश पांडव, डॉ. प्रियांका बंदिवडेकर, प्रा. अनिकेत इंदुलकर, प्रा. विशाल शेळके, प्रा. अक्षदा गीध, स्वीटी दळवी, सिद्दीका धोपे, प्रा. अश्विनी भोईर, प्रा. पूजा मोधळे, निकेत मंडावळे, रुपेश पाटील, प्रवीण पाटील, विजय जिनघरे, अर्जुन गोरखा, महेश म्हात्रे, निशिकांत मोधळे, नंदू पाटील आदी उपस्थित होते.