| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |
मुरूड शहरात माकडांनी मोठा उच्छाद मांडला आहे. माकडांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांने मोठे आर्थिक नुकसाना सहन करावे लागत आहे. मुरूडसह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आंबा आणि काजू याबरोबर इतर फळांचे उत्पन्न घेतले जाते. तसेच, भाजी-पाला व भात शेती देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, गेली काही वर्षे फळबागा आणि शेतीपिकांचे माकडांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि बागायतदार हवालदिल झाला आहे. त्यामुळे त्याला दरवर्षी मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. तसेच, रोज सकाळच्या सुमारास मुरुड शहरातील बाजारपेठेतील घरांच्या छपरावर मोठ्या संख्येने माकडे उड्या मारत असतात. त्यामुळे छपरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच, घराची खिडकी उघडी असली तर घरातील खाण्याच्या वस्तू उचलून नेतात. त्यामुळे महिला व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी दांडगुरीचे शेतकरी शरद खेडेकर यांनी वनखात्यात अनेक वेळा तक्रार केल्या आहेत. परंतु, वनखात्याकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे येथील नागरिकांमधून तिव्र नाराजी व्यक्त होत आहे.







