। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान या शहरात पर्यटकांना घेवून आलेल्या पर्यटकाच्या वाहनाने चार वाहने तसेच एका घोड्याला धडक दिली. नंतर तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना या किया गाडीला माथेरान नेरळ घाटात अपघात झाला. या अपघात प्रकरणी वन विभागाचे वनरक्षक यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, वाहनांना धडक देवून पळून जाण्यात यशस्वी ठरलेल्या त्या मद्यधुंद वाहनचालक याला माथेरान पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे येथील दिवा भागातील एक कुटुंब आपली किया जीप गाडी घेवून माथेरान येथे आले होते. शनिवारी (दि.4) रात्री कुटुंब यांना घेवून आलेली गाडी पर्यटक यांना सोडून पुन्हा ठाणे येथे जात होती. त्या गाडीचे चालक मोहनिश गणेश शितुलकर हा आपली किया जीप घेवून दस्तूरी येथून निघाला होता. त्या वाहनचालकाने आधी तेथे असलेल्या घोड्याला धडक दिली आणि नंतर वाहनतळ येथे असलेल्या चार वाहनांना धडक दिली. रात्रीच्या अंधारात आजूबाजूला फारशी कोणाला माहिती न झाल्याने मोहानिष हा आपली गाडी घेवून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. वाहनतळ येथून त्याची गाडी वेगाने टॅक्सी स्टँड येथून पुढे गेली. मात्र टॅक्सी स्टँड पासून पहिले दोन वळणे पार केल्यावर गार्बट रस्त्याच्या कोपऱ्यावर डाव्या बाजूने जाणारी थेट उजव्या बाजूला येवून धडकली. अपघातग्रस्त गाडी तेथेच टाकून मोहनिष हा नेरळ येथे पोहचला आणि आपल्या घरी गेला.
मात्र, मद्यसेवन करून वाहनतळ येथे मोहानिश शितलकर याने आपले ताब्यतील किया गाडीचे पार्किंग मधुन अति वेगाने बेदकारपणे चालवत निष्काळजीपणाने, चालवित नेवुन पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या चार गाडयांना ठोकर मारून अपघात करून तेथून पळ काढला होता. ही सर्व माहिती सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यावर लक्षात आली. त्यानंतर नेरळ पोलीस यांना माथेरान नेरळ घाटात किया गाडीला अपघात झाला असल्याची माहिती मिळाली. भरधाव वेगाने रस्त्याच्या परीस्स्थितीकडे दुर्लक्ष करून दस्तुरी ते नेरळकडे जाणारे रस्त्याने चालवित जावुन गारबट गावाकडे जाणारे रस्त्याजवळ रस्त्याचे कडेला असलेल्या लोखंडी संरक्षण तटबंदीला ठोकर मारू न अपघात करून स्वतःचे किरकोळ दुखापतीस तसेच इतर वाहनाचे नुकसान करून पळून गेलेला वाहन चालक शीतलकर याला माथेरान पोलिसांनी शोधून काढले आणि आरोपी केले. माथेरान वाहनतळ हा परिसर सीसीटिव्ही कॅमेरे यांचे कक्षेत असल्याने वन विभागाने त्या अपघाताची माहिती माथेरान पोलीस यांना दिली. वाहनतळ हे वन विभागाच्या अखत्यारीत असून वनरक्षक अभिमन्यू बारगजे यांनी त्याबाबत तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी चार गाड्यांना अपघात करुन पळून गेलेला वाहनचालक यास पकडून माथेरान मध्ये आणले. माथेरान पोलीस ठाणे येथे मोहनीश शीतलकर यांच्यावर गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास गणेश गिरी करीत आहेत.