केंद्रप्रमुख गणेश थवई यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

| पेण | प्रतिनिधी |
आमटेम केंद्राचे केंद्रप्रमुख तसेच आपल्या जादुई सूत्रसंचालनासाठी प्रसिद्ध असलेले गणेश हरिभाऊ थवई आपल्या 38 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापुर्ती सोहळा नुकताच नवनाथ नगर, पेण येथे संपन्न झाला.

थवई हे एक कार्यकुशल केंद्रप्रमुख म्हणून सर्वांना परिचित होते. केंद्रप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी अनेक उपक्रम राबवले. शिक्षणाची वारी हा त्यांनी राबवलेला उपक्रम जिल्ह्यात विषेश प्रसिद्ध झाला होता. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केलेला असून रायगड जिल्हा परिषदेचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच अनेक सेवाभावी संस्थांनी त्यांचा गौरव केलेला आहे.

शैक्षणिक क्षेत्राबरोबरच अध्यात्मिक निरुपणासाठी देखील ते जिल्ह्यात परिचित आहेत. विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन तसेच कबड्डी स्पर्धांच्या समालोचनासाठी प्रसिद्ध असलेल्या थवई यांच्या कारकिर्दीवर एक ध्वनी चित्रफित यावेळी दाखवण्यात आली. थवई यांच्यावर उदंड प्रेम करणाऱ्या त्यांच्या मित्र परिवाराने आपल्या आठवणी शब्दबद्ध करून पाठिराखा या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

या सोहळ्यासाठी पेण नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा प्रीतमताई पाटील जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील गटनेते अनिरुद्ध पाटील मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रघुनाथ थवई जिल्हा परिषद सदस्य हरिओम शेठ म्हात्रे माजी नगरसेविका वसुधाताई पाटील, निवृत्त निवृत्ती, पाटील प्रकाश रामाणे, भाजपा जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील माजी गटशिक्षणाधिकारी पी डी पाटील प्रसाद पाटील सर्व माजी केंद्रप्रमुख व सर्व क्षेत्रातील शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामकृष्ण भोईर यांनी केले.

Exit mobile version