कोलाड नाक्यावर रसायन भरलेल्या टँकरचे पाटे तुटले; मोठा अनर्थ टळला

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
कोलाड आंबेवाडी नाका येथील मुख्य चौकात पडलेल्या भल्या मोठया खड्ड्यात रसायन मालवाहतूक करणार्‍या टँकरचे चाक अडकले. त्यावेळी त्याचे पाटे तुटल्याने कोलाड आंबेवाडी नाक्यावर एकच खळबळ उडाली. परिणामी काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

टँकरचा चालक हा इंदापूर ते नागोठणेकडे जात असताना कोलाड आंबेवाडी नाक्यावर व मुख्य चौकात पडलेल्या भल्या मोठ्या खड्यात त्याचा टायर फसला आणि त्याचे खालील असलेले मेन पाटे तुटल्याने एकच आवाज झाला आणि काही क्षणातच खळबळ माजली. दोन्ही बाजूकडील ये-जा करणार्‍या वाहांची मोठी रांग लागून काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली.

वाहतूक कोंडी होताच कोलाड येथील पोलीस यंत्रणा या ठिकाणी दाखल होत कोंडी पंधरा ते वीस मिनिटांत नियंत्रित केली. यावेळी कोणतीही विपरीत घटना घडली नाही. टँकर पलटी झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.

Exit mobile version