। पनवेल । वार्ताहर ।
पार्क करून ठेवलेल्या कारची काच फोडून एक लाख रुपये आणि लॅपटॉपची चोरी केल्याप्रकरणी खांदेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत. सुयश नलावडे हे माणगाव येथे राहत असून त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावे असलेली कार ही जलाराम फास्ट फूडच्या समोर, अग्निशामक कार्यालयासमोर नवीन पनवेल येथे पार्क करून ठेवली व ते त्यांच्या मुलाला घेऊन मोहिते हॉस्पिटलमध्ये गेले. यावेळी गाडीमध्ये त्यांनी लॅपटॉप, ऑफिसचे कागदपत्र आणि बॅगमध्ये एक लाख रुपये ठेवले होते. ते संध्याकाळी कारमध्ये असलेले सामान घेण्यासाठी गेले असता कारची डाव्या साईडची काच कोणीतरी फोडल्याचे दिसून आले. गाडीमधून एक लाख रुपये आणि लॅपटॉप चोरीला गेल्याचे दिसून आले.