| मुंबई| प्रतिनिधी |
आष्टी तालुक्याचे आमदार सुरेश धस यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी मी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. महिलांवर फक्त चिखलफेक केली जाते. सांस्कृतीक कार्यक्रमात सत्कार स्वीकारताना आमदार धनंजय मुंडे यांचा फोटो आणि मी धन्यवाद म्हटले, यावरून माझ्याविरुद्ध आवई उठवली जाते. लोकप्रतिनिधी टिप्पणी करतात. मी म्हणते तुमच्या राजकारणात कलाकारांना मध्ये का खेचता? सामान्य कुटुंबातून आलेल्या मुली सिने क्षेत्रात येतात. संघर्ष करतात. प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. मात्र, तुम्ही महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवता, असा उद्वेग अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
मी विनंती करते, स्वतःच्या राजकारणासाठी कुत्सितपणे टिप्पणी केली. त्यांनी माझी नव्हे, अनेक महिलांची माफी मागावी. याविरुद्ध महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटली आहे. आपला टीआरपी वाढविण्यासाठी अशी टिपण्णी केली जाते. मात्र, त्याचा आमच्या कुटुंबियांना त्रास होतो. माझ्या भावाने सोशल अकाऊंट बंद केले. माझ्या आईला झोप नाही, असेही यावेळी प्राजक्ता माळी यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, युट्यूबर आणि चॅनेलच्या बाबतीत नियम करावे. कुठली सत्यता न पडताळता आपली टीआरपी वाढविण्यासाठी बातमी करणार्याविरुद्ध ठोस कारवाई करावी.
करुणाताई यांनी खातरजमा करुन मीडियासमोर बोलावे, अशी विनंती प्राजक्ता माळी यांनी केली. राजकीय पुढार्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी जाणार नाहीत. पुरुष कलाकारांची नावे का येत नाहीत. न्यूज पेपरमध्ये पण वाटेल ते मथळे देऊन बातमी करता, ते योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. एआयच्या जमान्यात आहोत. कुठला ही फोटो मोर्फ करू शकतो. सिनेक्षेत्रात काम करणार्या महिलांच्या वतीने मी बोलते आहे, असे माळी म्हणाल्या.