‘हा’ रस्ता वाहतुकीस मोकळा

विजय मापुस्कर यांचे अथक प्रयत्न
मुरुड | वार्ताहर |
टोकेखार ते सावली रस्त्यालगतच दरड कोसळून सदरचा रस्ता बंद झाला होता.रोहा तालुक्यास जोडणारा हा एकमेव मार्ग असून हा रस्ता दरडी कोसळल्यामुळे पूर्णतः बंद झाला होता.त्यामुळे मुंबई व रोहा येथील मार्ग बंद झाला होता.वाहतूक पूर्वरत करण्याचे मोठे आव्हान महसूल यंत्रणेवर होते. मुरुड चे तहसीलदार गमन गावीत यांनी स्वतः प्रयत्न सुरु करून याबाबतची जबाबदारी मंडल अधिकारी विजय मापुस्कर यांच्यावर दिली तहसीलदारांनी सोपवलेली जबाबदारी निष्ठापूर्वक पार पाडण्यासाठी मंडळ अधिकारी विजय मापुस्कर यांनी कठोर परिश्रम घेत सदरचा रस्ता दोन दिवसाच्या परिश्रमानंतर वाहतुकीस मोकळा करण्यात आला.

सदरचा रस्ता लवकरात लवकर वाहतुकीस मोकळा करणे खूप आवश्यक होते.कारण अलिबागला जोडणारा मुख्य रस्ता हा काशीद पूल कोसळल्यामुळे बंद ठेवण्यात आला आहे. तर सुपेगाव मार्ग वर प्रवास करण्यासाठी विहूर येथील पूल नादुरुस्त झाल्याने येथील सुद्धा काही काळ वाहतूक बंद होती.त्यामुळे भालगाव मार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी मोकळा होणे खूप गरजेचे होते.
मंडल अधिकारी विजय मापुस्कर यांनी अस्लम कादरी, सुनील पाटील, विलास पाटील,अशपाक कबले, महेंद्र गांधी, दिघी पोर्ट ,नगरसेवक प्रमोद भायदे, शांताराम पाटील,जे..एम.म्हात्रे ग्रुप,मुसवीर जमादार आदी चे महत्वपूर्ण सहकार्य घेत रस्त्यावर आलेलात चिखल दोन दिवसात दूर करण्यात त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.

टोकेखार सावली रस्ता मोकळा करण्यासाठी पाच जेसीबी, 10 डंपर, एक पोकलेन आदी साहित्य लागले होते. वरील सर्वानी मदत केल्यामुळे सदरचा रस्ता वाहतुकीस मोकळा झाला आहे.याबाबत तहसीलदार गमन गावीत,नायब तहसीलदार रवींद्र सानप,नायब तहसीलदार गोविंद कौटुंबे यांनी रस्ता मोकळा करण्यासाठी ज्यांनी मदत केली या सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

Exit mobile version