| पनवेल | वार्ताहर |
पनवेल रेल्वे स्टेशन फलाट क्र. 3 येथे अंदाजे 3 ते 4 वयोगटातील एक लहान मुलगी विनापालक रडताना आढळून आली असून, तिच्या नातेवाईकांचा शोध पनवेल रेल्वे पोलीस करीत आहेत. या मुलीचा रंग गहुवर्णीय आहे. अंगात निळ्या रंगाचा हाफ बाह्याचा टी-शर्ट व ब्राऊन रंगाची फुल नाईट पॅन्ट घातलेली आहे. तसेच डोक्याचे केस काळ्या रंगाचे त्याचप्रमाणे तिचे दोन्ही पाय गुडघ्यात वाकडे आहेत. ह्या मुलीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी म.पो.हवा.एस.एस.बोराटे यांच्याशी संपर्क साधावा.