मुंबई | प्रतिनिधी |
येत्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेने हा इशारा दिला आहे. आज उत्तर कोकण म्हणजे मुंबई, ठाणे, पालघरमध्ये एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, दोन दिवसानंतर पुन्हा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील तब्बल 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट तर एका जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट देण्यात आला आहे. कुलबा शाळेने हवामान खात्याने आज नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशीम, चंद्रपूर, आणि वर्धा अशा चौदा जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. याठिकाणी पुढील 24 तासात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.