वाहतूक सुरक्षेचे विद्यार्थ्यांना धडे

पेण आरटीओकडून मार्गदर्शनपर कार्यशाळा
जी.एम. वेदक इंजिनिअरिंग कॉलेजचा स्तुत्य उपक्रम

| तळा | वार्ताहर |

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेण रायगड आणि जी.एम. वेदक इंजिनिअरिंग कॉलेज तळा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थी सुरक्षित वाहतूक मार्गदर्शन कार्यशाळा सडक सुरक्षा जीवन रक्षा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्रा. डॉ. दिलीप जयस्वाल हे होते. तर विचार मंचावर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पेणचे मोटार वाहन निरीक्षक शशिकांत तिरसे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दिनेश शर्मा, दिग्विजय कोळी, विशाल जाधव, नायब तहसीलदार मंगेश पालांडे, नगरपंचायत प्रतिनिधी संदेश मांगडे, तालुका कृषी प्रतिनिधी सुनील गोसावी, रजिस्टर नारायण डेग्वेकर, संस्था प्रतिनिधी पुरुषोत्तम मुळे, रिक्षा मिनिडोर चालक-मालक संघटना प्रतिनिधी, द.ग. तटकरे कॉलेजचे प्रतिनिधी डॉ. थोरात, कॉलेजचे प्रतिनिधी डॉ. सचिन बंगाळे, जुनिअर कॉलेज प्रा. दिलीप ढाकणे, इंजिनिअर प्राध्यापक, तालुक्यातील हायस्कूलचे मुख्याध्यापक, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, पंचायत समिती शिक्षण विभाग प्रतिनिधी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरुवातीला सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक दिग्विजय कोळी यांनी प्रास्ताविकात शालेय विद्यार्थी सुरक्षित वाहतुकीसंदर्भात माहिती दिली. शशिकांत तीरसे यांनी वाहतुकीचे नियम पालन केले तर अपघात टाळता येतील. वाहनांची वेगमर्यादा वाढवल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. नियमांचे पालन होत नाही. वयाच्या 18 वर्षाखालील मुले वाहन चालवू नयेत, तसेच आढळल्यास पालकांना व तीन वर्षाची शिक्षा आहे. टू व्हीलर चालविताना हेल्मेट असावे. वेगाने गाडी चालवणे, स्टंटबाजी करणे यामुळे देखील अपघात होऊ शकतात. तेव्हा वाहन चालकाने चुकीच्या गोष्टींचा वापर न करता नियमांचे पालन करून चालविल्यास अपघाताला आळा घालता येईल, असे सांगितले. यानंतर प्रा. डॉ. दिलीप जयस्वाल यांनी देखील याबाबत मनोगत व्यक्त केले. तर पुरुषोत्तम मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आरटीओ कार्यालयातर्फे स्तुत्य उपक्रम घेण्यात आला. जेणेकरून अपघात कशा स्वरूपात होतात याची माहिती सांगताना मनुष्यप्राणी हा हजारो वर्षानंतर जन्माला येतो. त्याचा आनंद, सुख घेता आले पाहिजे. अपघातात आपले शारीरिक नुकसान करून घेऊ नये. अपंगत्व किंवा प्राणहानी टाळता आली पाहिजे हे सांगून संस्थेतर्फे व महाविद्यालयाच्या तर्फे सर्व उपस्थितांचे आरटीओ कार्यालय पेण रिक्षा चालक-मालक संघटना पदाधिकारी शिक्षक प्राध्यापक यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दिनेश भगत यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनएसएस विभाग प्रमुख प्रा. स्नेहल मोरे, प्रा. पंकज धोंडगे व एनएसएस विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version