| पनवेल | प्रतिनिधी |
इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने, त्याचबरोबर पथकराच्या रकमेत वाढ झाल्याने वाहतूकदार व्यावसायिक आर्थिक विवंचनेत आहेत. त्याचबरोबर आता अनेक ठिकाणी अवजड वाहनांना प्रवेश नाकारला जात असल्याने त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याने ट्रक आणि ट्रेलरचे हप्ते भरणेसुद्धा कठीण होऊन बसले आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी व्यावसायिक करत आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये काहीसे मंदीचे वातावरण असल्याने त्याचा प्रत्यक्ष प्रत्यक्ष परिणाम वाहतूक व्यवसायावर झालेला आहे.