। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग-बेलकडे रस्त्यावर गुरुवारी (दि.30) सायंकाळी तीन वाहनांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दुचाकीचे नुकसान झाले असून चालक जखमी झाले आहेत. या रस्त्यावर ट्रक आणि दोन दुचाकीचा अपघात झाला असून ट्रक चालक चुकीच्या बाजूने आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखा व अलिबाग पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमीला रुग्णालयात पाठवण्याबरोबरच वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.