। रायगड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा शेतकरी कामगार पक्षाचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. क्रीडा विश्वात रायगड जिल्ह्याचे नाव यशोशिखरावर नेणार्या खेळाडूंना पाठबळ देताना कोणतेही राजकारण न करता केवळ खेळाला महत्व देऊन खेळाडूंचे भविष्य उज्वल करण्याचे ध्येय शेकापने उराशी बाळगले आहे. खेळाडूंनी फक्त दिलेल्या संधीला सुवर्णसंधीमध्ये बदलायचे आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून राजकीय पटल यशस्वीपणे पादाक्रांत करीत असताना आम्ही तुमच्यासाठी आहोत, आम्ही सुखात आणि दुःखात तुमच्या सोबत आहोत. जिंकलो, हरलो, राजकीय क्षेत्रात उच्चस्थानावर गेलो. तरीदेखील आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा उर्फ चिऊताई पाटील यांनी केले.
देशातील सर्वात मोठी टेनिस क्रिकेट स्पर्धा म्हणून लोकप्रिय असणारी तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन आणि अनेक सुपरस्टार ज्या क्रिकेट स्पर्धेसोबत जोडले गेले आहेत अशा टेनिस क्रिकेट स्पर्धेत स्थानिक खेळाडूंना संधी मिळावी यासाठी राज्यातील पहिला प्रयत्न चित्रलेखा पाटील यांच्यावतीने अलिबागमध्ये यशस्वी झाला.
सीएफटीआयआणि यूव्हीस्पोर्ट्स अकॅडमी यांच्या माध्यमातून येथील हॉटेल मॅपल आयव्ही येथे आयएसपीएल लीग टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या दुसर्या पर्वातील खेळाडू नोंदणी कार्यक्रमावेळी उदघाटक म्हणून चित्रलेखा पाटील बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माझी मुंबई संघाचा कर्णधार योगेश पेणकर, शेकापच्या राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे , जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील , जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव प्रदीप नाईक, तालुका चिटणीस अनिल पाटील, संजना किर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय गिदी, नीता गिदी, तुकाराम पाटील, राकेश पाटील, अवधूत पाटील, आयएसपीएलचे निवड समितीचे प्रमुख अमरजित गाध्री, सुरेश घरत, राजू म्हात्रे, निलेश खोत, जगन्नाथ पाटील, सुभाष वागळे, नौशाद दापोलकर, धर्मेंद्र तांडेल, मोहन धुमाळ, संजय पाटील, प्रसिद्ध समालोचक संदीप जगे आदी मान्यवर आणि आयएसपीएलची टीम उपस्थित होती.
शेतकरी कामगार पक्ष आणि पाटील कुटुंबिय असे समीकरण आहेच. रायगड जिल्ह्यातील जनतेच्या पाठीशी ठाम उभे राहून विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांना पाटील कुटुंबियांनी नेहमीच व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ना. ना. पाटील यांनी शेतकर्यासांठी संप यशस्वी केला. भाऊ प्रभाकर पाटील आणि माजी विरोधी पक्ष नेते दत्ता पाटील यांनी तळागाळातील जनतेला शिक्षण मिळावे यासाठी शाळा महाविद्यालये सुरु केली. मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी म्हणून सायकल वाटप करून अनोखे व्यासपीठ निर्माण केले आहे. शेकापने दिलेल्या मदतीचा आणि निर्माण केलेल्या व्यासपीठामुळे रायगड जिल्ह्याने सर्व क्षेत्रात प्रगतीचे शिक्षणेगाठले आहे. असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.
स्थानिक कलाकारांना शेतकरी कामगार पक्षाने पीएनपी नाट्यगृहाचे व्यासपीठ दिले. या नाट्यगृहाच्या माध्यमातून जोडले गेलेले तब्बल 70 यु ट्युबर्स आणि फिल्म निर्मिती करणार्यांना शेकापने प्रायोजकत्व दिले आहे. याचा धर्तीवर आयएसपीएलच्या माध्यमातून अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यातील क्रिकेट खेळणार्या खेळाडूंना व्यासपीठ देण्याचा हा प्रयत्न आहे. या तीन तालुक्यातील विकासाचा नवा अध्याय लिहिण्यासाठीचे नियोजन सुरु केले आहे. या तालुक्यांमधील जनतेला अपेक्षित असणारा विकास करण्याचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवले आहे. कोणतेही राजकारणन करता केवळ खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करू देण्याचा प्रयत्न आहे. खेळाडूंना पाठिंबा देऊन त्यांना क्रीडा क्षेत्रात गगन भरारी मारण्यासाठीचे बळकट पंख देण्याचा प्रयत्न असणार आहे असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.
यूव्ही स्पोर्ट्स अकॅडमी नावाची संस्था अलिबाग तालुक्यात तयार होऊन आता महाराष्ट्रासह अन्य राज्यात देखील आपले पाय रोवत आहे. यूव्ही स्पोर्ट्सनेदक्षिण भारतात स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, नागाव येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले आहे. आता वायझॅक येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनविण्याचे काम सुरु आहे, त्याचबरोबर पॅन इंडिया खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी यूव्ही स्पोर्ट्सचेकाम करते. युव्हीचाअर्थचमुळात तुम्ही आणि आम्ही देशासाठी जास्तीत जास्त पदके जिंकू असा आहे. यशस्वी झालेल्यांनामदत करण्यापेक्षा यशाचा मार्ग शोधणार्यांना मदत करणे मोठे कार्य असते हेच कार्य आता यूव्ही स्पोर्ट्सच्यामाध्यमातून केले जातआहे. असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.
आयएसपीएलचे व्यासपीठ अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यातील खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यामागे केवळ क्रीडा क्षेत्राला उभारी मिळवून देणे एवढाच उद्देश आहे. या सभागृहात उद्याच्या क्रिकेटचे भविष्य लपले आहे. या सभागृहात उद्याचा सचिन आणि धोनी बसले आहेत. कारण टेनिस क्रिकेटचा वाढता प्रसार पाहता पुढील काळात टेनिस क्रिकेटलासुगीचे दिवस येणार आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये भविष्य घडविण्याचीहि संधी आहे. क्रीडा क्षेत्रात काम केले तर आपण रोजगार मिळविण्याबरोबर आपल्या नावाचे वलय निर्माण करू शकतो. आपल्या तालुक्यासह देशाचे नाव आपण उज्वल करू शकतो. संधी सहाजपणेमिळत नाही. संधीचे सोने करताना खेळाडूंनी आपले धेय्य आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी मेहनत करायला हवी. असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.
पहिल्या 100 क्रिकेटवीरांचे मोफत रजिस्ट्रेशन
अलिबाग - मुरुड - रोहा तालुक्यातील सर्व क्रिकेटर्ससाठी आयएसपीएल लीग 2024 टेनिस क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्याची शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख, युव्ही स्पोर्ट्सच्या अध्यक्षा चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी देण्यात आली.अलिबाग वेश्वी हॉटेल मॅपल आयव्ही येथे स्पर्धेतील खेळाडूंचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पहिल्या 100 क्रिकेटवीरांचे रजिस्ट्रेशन युव्ही स्पोर्ट्सच्या अध्यक्षा चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या माध्यमातून मोफत करण्यात आले. या संधीचा टेनिस क्रिकेट खेळाडूंनी लाभ घेतला.