| मुंबई | प्रतिनिधी |
आज सकाळच्या सुमारास मुंबईला हादरवणारी घटना घडली आहे. मुंब्रा ते दिवादरम्यान लोकलमधून आठ ते नऊ प्रवासी खाली पडून 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटीच्या दिशेने जाणारी आणि एक कल्याण-कसाराच्या दिशेने जाणारी लोकल एकाच वेळी आल्या. यावेळी अपघातातील सर्व प्रवासी फूटबोर्डवर उभे होते. त्यावेळी दिवा-मुंब्रामधील एका वळणावर दोन्ही लोकलमधील आठ ते नऊ प्रवाशांना एकमेकांचा धक्का लागून ते रॅल्वे रुळावर पडले. त्यानंतर साडेनऊ वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली होती. त्यानंतर ९ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचल्या. दरम्यान, एका जखमी प्रवाशाने माहिती दिली की तो फुटबोर्डवरून प्रवास करत होता. दोन्ही लोकल ट्रॅकमधील अंतर दीड ते दोन मीटरचं असतं. लोकलच्या दरवाच्यावर लटकलेल्या एका प्रवाशाच्या पाठीला त्याची बॅग लटकलेली होती. त्या बॅगेला समोरील ट्रेनचा प्रवासी अडकल्यामुळे ही घटना घडली.
अपघातानंतर रेल्वे प्रशासन सतर्क
या अपघातानंतर रेल्वे प्रशासन सतर्क झाला असून, महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता येणाऱ्या नवीन गाड्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसह येतील. त्याच्यामध्ये 238 एसी लोकल मुंबई उपनगरासाठी घेतले जाणार आहेत. या गाड्यांना ऑटोमॅटिक डोअर फिटमेंट असेल. तिसरा निर्णय म्हणजे आयसीएफद्वारे आताच्या लोकल गाड्यांना रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती, जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. चौथ्या रेल्वे मार्गिकेचा प्लॅनतसेच सातत्याने घडणारे अपघात थांबवण्यासाठी मध्य रॅल्वेने कल्याणहून कसारापर्यंत चौथ्या रेल्वे मार्गिकेचा प्लॅन आखला आहे. तर कल्याणपासून कर्जतपर्यंत तिसरी-चौथी रेल्वे मार्गिका सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दिवा आणि दादरपासूनदेखील सीएसएमटीपर्यंत पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गिकेचं प्लॅनिंग पूर्ण झालं आहे. यामध्ये कुर्ला स्थानकापर्यंतचे काम पूर्ण झाले असून यापुढे जमीन मिळवण्याचे प्रशासन कार्यरत आहे. तसेच सिग्नलिंगची सिस्टिम देखील सुधारित केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.