। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरूड-जंजिरा नगरपरिषद तर्फे बाजारपेठकरिता तसेच घरातील व दुकानातील कचरा घेण्यासाठी दिवसातून दोनवेळा घंटागाडी येत असते. तरी देखील बाजारपेठेतील काही भाजी विक्रेते कचरा घंटा गाडीत न टाकता रात्रीच्या वेळी दुकानाच्या समोरच फेकुन दिला जातो. त्यामुळे या ठिकाणी खाण्याच्या शोधात आलेली उनाड गुरे हा कचरा सर्वत्र पसरवतात. त्यामुळे दुसर्या दिवशी सकाळी परिसरातील नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. काही वेळी येथील कचर्यात फेकण्यात आलेला भाजीपाळा खातेवेळी या उनाड बैलामध्ये तुंबळ हाणामारी होत असते. त्यामुहे नागरिकांना दुखापत होत असून वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे उघड्या जागेवर कचरा फेकणारे भाजी विक्रेते, दुकानधारक व हातगाडी चालक-मालकांवर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.