। उरण । वार्ताहर ।
होळी सणानिमित्त जिल्ह्यातील विविध बाजारपेठा रंगीबेरंगी पिचकार्यांनी सजल्या आहेत. दरम्यान, होळी आणि धुलिवंदनाच्या पूर्वसंध्येला बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी विविध प्रकारच्या पिचकारी, गुलाल, रंग आणि होळीच्या साहित्याने दुकाने फुलून गेली आहेत. दरम्यान, उरण शहरातील मुख्य बाजारपेठेमधील दुकाने रंगीबेरंगी पिचकार्यांनी सजली आहेत. यावेळी कुटुंबांसोबत खरेदीसाठी आलेले नागरिक आणि लहान मुलांचा उत्साह बाजारात पाहायला मिळत आहे. त्यामुळे रंगांची उधळण करण्यासाठी उरणकर सज्ज झाले आहेत.
यंदा बाजारात कार्टून थीम असलेल्या पिचकारी तसेच, बॅकपॅक वॉटर गन आणि प्रेशर स्प्रे पिचकार्यांना मोठी मागणी आहे. लहान मुलांसाठी सुपरहिरो आणि अॅनिमेटेड थीम असलेल्या पिचकार्या विशेष आकर्षण ठरत आहेत. त्याचबरोबर, पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग आणि हर्बल गुलालालाही चांगली मागणी आहे.