। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे येत्या पुढील तीन ते चार तासांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे बाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.