। कोर्लई । वार्ताहर ।
माजी लष्कर प्रमुख तथा अलिबागचे सुपुत्र शहिद जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या तैलचित्राचे अनावरण प्रजासत्ताक दिनापूर्वीच केले जाईल. असे रायगड पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले आहे.शहिद जनरल अरूणकुमार वैद्य यांची स्मृती जागृत होण्यासाठी त्यांचे तैलचित्र पोलिस अधिक्षक यांच्या कार्यालयासमोरील भिंत वजा कठड्यावर लावावे, अशी लेखी मागणी ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी फेब्रुवारी 2024 रोजी पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे केली होती. 17 जानेवारी रोजी पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्याशी संपर्क साधला असता शहिद अरुणकुमार वैद्य यांच्या तैलचित्राचे अनावरण येत्या प्रजासत्ताक दिनापूर्वी केले जाईल, असे सांगण्यात आले.