| पुणे | प्रतिनिधी |
वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी निलेश चव्हाणला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून निलेश चव्हाण हा फरार होता. अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला शोधून काढलं आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या चुलत्यांसह इतरांना धमकावणाऱ्या आणि इतर आरोप असणारा निलेश चव्हाण फरार होता. गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांची सहा पथकं निलेश चव्हाणचा शोध घेत होते. तो दुसऱ्या राज्यात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु, तो नेपाळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली आहे. लवकरच त्याला पिंपरी-चिंचवडमध्ये आणले जाणार आहे.