| अलिबाग | वार्ताहर |
प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचातर्फे जागतिक छायाचित्र (फोटोग्राफी) दिनाचे औचित्य साधुन प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय रामनारायण सभागृहात जेष्ठ छायाचित्रकार वामन पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन मंचाचे अध्यक्ष सखाराम आण्णा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नागेश कुळकर्णी, शरद कोरडे, राजाराम भगत, भारत रांजणकर, उल्हास पवार, भालचंद्र वर्तक, हेमकांत सोनार, झेबा कुरेशी आदी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे आभार उल्हास पवार यांनी मानले.