राजखलाटी विद्यालयात विविध कार्यक्रम

। खांब । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विठ्ठलवाडी-राजखलाटी विद्यालयात शनिवारी (दि.24) विविध प्रकारचे कार्यक्रम संपन्न करण्यात आले. यावेळी दहावीच्या विद्याथ्यांना परीक्षेसाठी व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच, सन्मान, वार्षिक गुणवत्ता व क्रीडा पारितोषिक वितरण सोहळा आदी कार्यक्रम संपन्न करण्यात आले.

कार्यक्रमाला रामचंद्र चितळकर, लक्ष्मण धनावडे, कृष्णराम धनवी, चिंदू धामणसे, अर्चना मरवडे, शिल्पा मरवडे, गौतम जाधव, ऋषीकेष महाडिक, सुजित लोखंडे, नितेश पोटफोडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version