भाज्यांच्या विक्रीतून रोजगाराची निर्मिती
| आगरदांडा | प्रतिनिधी |
महागाईमुळे घरातले बजेट दिवसांनदिवस कोलमडल्याने आर्थिक खर्च भागवण्यासाठी मुरूड पंचक्रोशीभागातील तेलवडे,शिघ्रे ,वाणदे, जोसराजंण, शिघ्रे वरची वाडी,खारअंबोली , कोर्लई या गावातील 15 ते 20 महिलांनी आप आपल्या घराच्या मागील बाजूस, शेतात तर कोणी वाढीतील जागेत सर्व प्रकारचे गावठी भाज्यांचे भरघोस उत्पादन घेवुन विक्री होवु लागली यामधुन महिलांना चांगला रोजगार मिळत असल्याने शहरातील भाजीमार्केटच्या आवारात विक्री करण्याकरिता महिलांवर्ग सरसावल्याचे चित्र बाजारात पहावयास मिळत आहे.या भाजीपाल्याचा आधारामुळे महिलांना चार पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात मुरूड- पंचक्रोशीभागातील महिलां काम करीत आहेत.
मुरुड शहर हा मुख्य बाजारपेठ असल्याने प्रत्येक व्यवसायिक शहरात येऊन आपला व्यवसाय करीत असतो.पंचक्रोशीतील महिला ही आपल्या शेतातील, वाढीतील तयार झालेली ताजेतवानी भाजी मुळा गवार , टमाटो काकडी , कारले , गवार , वांगी, भेंडी, मिरची , पपई , दुधी ,पालक , मेथीं , माट , भाजी अशा एक ना अनेक प्रकारच्या शेंग भाज्या पालेभाज्यांचे पिक घेण्याचे काम महिला करीत आहेत.हाच माल घेऊन मुरूड बाजार पेठेतील रस्तावर दुकान मांडुन तीन-चारशे रूपये मिळवण्याचा खटाटोप करताना दिसत आहेत. हा भाजीपाला रासायानिक खतांचा वापरविना वाढवलेला असल्याने ग्राहकांकडुन या भाज्यांना अधिक पंसती मिळते. या भाज्यांना पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने भाज्या अगदीच वीस रूपये पाव कधी पंधरा रुपये पाव किलो या भावाने विकल्या जात आसल्याने ग्राहक मोठ्या भाजी विक्रेत्यांकडे न जाता वाट्यावरील भाज्या खरेदी करताना दिसत आहेत. यातून पंचक्रोशीभागातील महिलांना रोजगाराची संधी मिळताना दिसत आहे.