व्हायरल ! महिलांना एसटी बसमधून मोफत प्रवास

| अलिबाग | प्रतिनिधी |

महिलांना एसटी बसमधून मोफत प्रवास असा मेसेज सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्रदेखील आहे. मात्र अशा कोणत्याही प्रकारची जाहिरात एसटी महामंडळाने काढली नसल्याचा खुलासा विभागाने केला आहे. बनावट मेसेज व्हायरल होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

राज्यातील महिलांना एसटीतून मोफत प्रवास एक डिसेंबर सुरू असल्याचा मेसेज गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्याचा त्रास एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना होऊ लागला आहे. याबाबत वाहकांसोबत अनेक वेळा महिला प्रवाशांसोबत शाब्दीक वादही झाल्याचे समोर झाले आहे. अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version