आधारकार्ड अपडेट करायचयं? जाणून घ्या स्टेप्स…

भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधारमधील काही माहिती चुकीची असेल तर आपल्याला अनेक अडचणी येतात. याशिवाय आधारशी आपला सुरू असलेला मोबाइल नंबर जोडलेला असणे गरजेचे आहे. पण यासाठी सतत वेगवेगळे फॉर्म भरणे, सतत सायबर मध्ये चौकशाीसाठी जाणे या गोष्टी करण्याची आता काहीच गरज नाही. कारण, आता तुम्ही घरबसल्या देखील आधार आणि मोबाइल नंबर अपडेट करू शकता. आधारमध्ये मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे. याद्वारे आपल्याला घरूनच मोबाइल नंबर अपडेट करण्याची सुविधा मिळणार आहे.

घरबसल्या अपडेट करा मोबाइल नंबर-
युआयडीएआय ने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेसोबत एक करार केला आहे. या अंतर्गत आपण आपल्या घरी पोस्टमनला बोलवून आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर बदलू शकता. आयपीपीबीची ही सुविधा त्यांच्या 650 शाखांमध्ये उपलब्ध असेल. या सर्व्हिससाठी 1 लाख 46 हजार पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक उपलब्ध असतील. लवकरच या सेवेद्वारे लहान मुलांचे आधार देखील बनवले जाईल. आधार आणि पोस्ट ऑफिसच्या या नवीन सुविधेद्वारे मोबाइल नंबर अपडेट करणार्‍या कोट्यावधी लोकांना फायदा होईल. ज्या लोकांचा मोबाइल नंबर बंद झाला आहे अथवा रजिस्टर्ड नाही, ते सहज नंबर अपडेट करू शकतील.

आधार सेंटर वर जाऊन बदलू शकता मोबाइल नंबर-
1)यासाठी तुम्हाला आधार एनरोलमेंट/अपडेट सेंटरवर जावे लागेल.
2)यानंतर आधार कार्डमध्ये बदल करण्यासाठी फॉर्म भरून द्यावा लागेल.
3)जो मोबाइन नंबर अपडेट करायचा आहे तो फॉर्ममध्ये भरा व त्यानंतर फॉर्म जमा करा.
4)यानंतर व्हेरिफिकेशनसाठी बायोमॅट्रिक्स द्यावे लागेल.
5)आता एक्झिक्यूटिव्हद्वारे तुम्हाला एक पावती दिली जाईल.
6)या पावतीवर एक रिक्वेस्ट नंबर असेल.
7)या नंबरचा उपयोग तुम्ही अपडेशन स्टेट्स तपासण्यासाठी करू शकता.
8)आधारमध्ये मोबाइल नंबर अपडेट केल्यानंतर तुम्हाला नवीन आधार कार्ड घेण्याची गरज नाही.
9)नवीन मोबाइल नंबर अपडेट झाल्यानंतर त्याच नंबरवर आधार संबंधित ओटीपी येतील.

घराचा पत्ता बदलला असल्यास असा करा -आधार कार्ड वर अपडेट, पाहा स्टेप्स –
बर्‍याच वेळा आपल्याला एका शहरातून दुसर्‍या शहरात किंवा त्याच शहरात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जावे लागते. साहजिकच आपला राहण्याचा पत्ता बदलतो. अशात आधार कार्डमधील पत्ता बदलणे देखील आवश्यक असते. सध्या प्रत्येक सरकारी किंवा असरकारी कामासाठी आधार कार्ड महत्वाचे झाले आहे. मग ते काम बँकेशी संबंधित काम असो किंवा घराशी. आधार कार्ड एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज बनले आहे . अशात जर काही कारणास्तव घर किंवा पत्ता बदलला तर आधार कार्डवर ते अपडेट करणे आवश्यक असते. काही सोप्या ट्रिक्स वापरून ते सहज करता येईल.
आता आधार कार्डमधील माहिती अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर जाण्याची अजिबात आवश्यकता नाही, घरी बसून ऑनलाईन तुम्ही हे करू शकता. यासाठी यूआयडीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सहजपणे ऑनलाइन करता येतील. जाणून घ्या टिप्स.

  1. सर्वप्रथम आपल्याला यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी लागेल.
  2. यानंतर तुम्हाला मुख्यपृष्ठावरील माय आधार विभागात जावे लागेल.
  3. येथे आपल्याला आपला आधार अपडेट करा असा कॉलम दिसेल ज्यामध्ये आपल्याला अपडेट लोकसंख्याशास्त्र डेटा ऑनलाईन वर क्लिक करावे लागेल. या पर्यायावर क्लिक करताच यूआयडीएआयचे सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल (एसएसयुपी) लिंक तुमच्या समोर उघडेल.
  4. येथे तुम्हाला प्रोसीड टू अपडेट आधार पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  5. या पर्यायावर क्लिक करताच तुम्हाला आधार कार्ड क्रमांक आणि कॅपचा कोड प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल. त्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल, ओटीपी प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
  6. ओटीपी एन्टर केल्यावर एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल जिथे तुम्हाला दोन पर्याय मिळतील, तुम्हाला अपडेट डेमोग्राफिक्स डेटा वर क्लिक करावे लागेल.
  7. त्यानंतर तुम्हाला अ‍ॅड्रेस पर्यायावर क्लिक करावे लागेल, खाली तुम्हाला दिसेल की तुम्हाला वैध कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत सबमिट करावी लागेल. यानंतर प्रोसीड वर क्लिक करा.
  8. यानंतर तुम्हाला तुमचा जुना पत्ता दिसेल आणि खाली काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल आणि वैध कागदपत्रेही अपलोड करावी लागतील. यानंतर आपण प्रिव्हयु देखील पाहू शकता.
    प्रिव्हयु नंतर, अंतिम सबमिट करता तेव्हा आपल्याला अपडेट विनंती क्रमांक म्हणजेच यूआरएन मिळेल, ज्याच्या मदतीने आपण यूआयडीएआय वेबसाइटवर स्थिती तपासू शकता.
Exit mobile version