। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
गॅस शेगडीवरील गरम तवा मारुन दुखापत व मारण्याची धमकी देणार्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश कृष्णा कोडविलकर (कोकणनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि.22) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास राजनगर येथे घडली आहे. पीडीत महिलेचे पती निलेश याने त्यांच्याशी भांडण करुन गॅस शेगडीवरील गरम तवा त्यांच्या डाव्या खांद्यावर मारुन दुखापत केली आहे. तसेच, मारहाण व शिवीगाळ करुन मारण्याची धमकी देखील दिली आहे. या प्रकरणी पीडीत महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित निलेश कोंडविलकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.