| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागमधील 6 महाराष्ट्र बटालियन एनसीसी मुंबईमार्फत अलिबाग समुद्रकिनारी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. यावेळी एनसीसी कॅडेटने योगाचे धडे घेतले. एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग हा उद्देश समोर ठेवून नाविन्य उपक्रम राबविण्यात आला. अलिबागमधील जेएसएम कॉलेज, पोयनाडमधील नाना पाटील हायस्कूल, रोहा हायस्कूलमधील 260 एनसीसी कॅडेटने यामध्ये सहभाग घेतला होता. यावेळी नता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, कमांडिंग ऑफिसर कर्नल नितेश पटियाल, प्रथम अधिकारी समाधान भंडारे प्रशासन अधिकारी कर्नल आशिष कुमार, प्रथम अधिकारी अडसूळ, जेएसएम कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, उपस्थित होते. यावेळी सुभेदार सच्चिदानंद यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संपूर्ण व्यवस्थापन आणि संचलन कॅप्टन डॉ. मोहसीन खान यांनी केले.