श्रीराम कमळपाडा विजेता
| पोयनाड | वार्ताहर |
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित विभागीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत श्रीराम कमळपाडा संघाने विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात बालयुवक पेझारी संघाचा पराभव केला.
पोयनाड विभाग टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने झालेल्या स्पर्धेत एकूण 24 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना बालयुवक पेझारी आणि श्रीराम कमळपाडा या दोन संघांमध्ये झुंझार युवक मंडळाच्या मैदानावर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करत श्रीराम कमळपाडा संघांनी 3 षटकांमध्ये 19 धावसंख्या उभारली. प्रतिउत्तर देतांना बालयुवक पेझारी संघांनी 3 षटकांच्या समाप्ती नंतर केवळ 16 धावा केल्या अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात श्रीराम कमळपाडा संघाने सामना 4 धावांनी जिंकला. अंतिम सामन्यात सुरेख गोलंदाजी करणार्या कमळपाडा संघाचा ओंकार पाटील याला सामनावीर, उत्कृष्ठ फलंदाज स्टार नवजावन चौकीचापाडा संघाचा सूयेश पाटील, उत्कृष्ठ गोलंदाज बालयुवक पेझारी संघाचा अमित पाटील तर स्पर्धेचा मालिकावीर म्हणून श्रीराम कमळपाडा संघाचा संदेश बैकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो श्रीराम कमळपाडा संघ. त्यांना रोख 15 हजार रुपये पुरस्कृत भूषण चवरकर माजी सरपंच पोयनाड व कै.अर्जुन गणपत गायकवाड स्मृतीचषक पुरस्कृत यश शैलेंद्र गायकवाड, द्वितीय क्रमांक बालयुवक पेझारी संघ रोख रु.10 हजार पुरस्कृत राज भरत जैन, तृतीय क्रमांक झुंझार युवक मंडळ पोयनाड संघ रोख रु.6 हजार पुरस्कृत नेहल अग्रवाल, चतुर्थ क्रमांक स्टार नवजावन चौकीचापाडा रोख रु.6 हजार पुरस्कृत कै. शकुंतला संपतराज जैन यांच्या स्मरणार्थ ललित संपतराज जैन व कै.अर्जुन गणपत गायकवाड स्मृतीचषक देऊन गौरविण्यात आले.
पोयनाड मधील गुणवंत विध्यार्थी म्हणून संयुक्ता हुजरे, गौरव धिंगणकर, जय पाटील, जयेश म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेच्या बक्षीस वितरण्याचा कार्यक्रमासाठी पोयनाडचे माजी सरपंच भूषण चवरकर, राज जैन, नेहल अग्रवाल, शैलेंद्र गायकवाड, पंकज चवरकर झुंझारचे अध्यक्ष अन्वर बुराण, सचिव किशोर तावडे, अजय टेमकर, महेंद्र पालव, सुजित साळवी, अजित चवरकर, निहाल चवरकर, जय पाटील, आदित्य सुर्वे, यश गायकवाड यांच्या सह विभागातील क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.