| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक सक्षम आणि दर्जेदार स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी आ. महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी मंजूर झालेल्या अंदाजे सहा कोटी रुपयांच्या निधीअंतर्गत कामांचा शुभारंभ करण्यात आला.
शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक संकेत भासे यांच्या उपस्थितीत या विकासकामांचे भूमीपूजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. याप्रसंगी नगरसेवक रामदास गायकवाड, किशोर कदम, वैभव सुरावकर, अरुणा वायकर, जान्हवी देवघरे, रोहित ओसवाल, मोहन ओसवाल, फुटरमल ओसवाल, दिनेश जैन, पंकज ओसवाल, अरविंद जैन, अजित ओसवाल, कुंदनमल ओसवाल आदी उपस्थित होते. या विकासकामांमुळे शहरातील अनेक प्रभागांमधील रस्ते, गटारे आणि इतर नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न मार्गी लागणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या विकासकामांच्या भूमीपूजनाची सुरुवात दहिवली परिसरातील सोनार आळी येथून करण्यात आली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्ते व गटारांच्या कामांना अखेर हिरवा कंदील मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.







