रायगड जिल्ह्यात 14 रुग्ण; एकाच मृत्यू

23 कोरोनामुक्त, 10 तालुक्यात नवीन रुग्ण नाही

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात बुधवार दि. 1 डिसेंबर रोजी कोरोनाच्या 14 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 23 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच 10 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
बुधवारी पनवेल महापालिका हद्दीत 7, उरण 1, खालापूर 2, कर्जत 2, अलिबाग 1, मुरुड 1 असे 14 रुग्ण आढळले. तसेच पनवेल ग्रामीण, पेण, माणगाव, तळा, रोहा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर या 10 तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 72 हजार 070 झाली आहे. यापैकी 1 लाख 67 हजार 255 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 576 वर गेला आहे. सद्यस्थितीत 239 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version