जिल्हा रुग्णालयातील प्रकार
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
एस.सी.कोटयामधुन एम.बी.बी.एस.साठी प्रवेश घेवून देतो असे सांगून 20 लाखांचा चुना महिलेला लावण्याचा प्रकार जिल्हा रुग्णालयात झाला आहे. याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा रुग्णालयातील दोघा जणांनी 21 डिसेंबर रोजी व 28 डिसेंबर या कालावधीत यांतील महिला फिर्यादी रा. 77, सी. जाधवजी जेठाभाई चाळ, तात्या घारपुरे पथ, गिरगांव मुंबई यांची मुलगी हिला एस.सी.कोटयामधुन एम.बी.बी.एस.साठी प्रवेश घेवून देतो, असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यापोटी फिर्यादी यांचेकडून रोख रक्कम पंधरा लाख रुपये व युनियन बँक ऑफ इंडिया खात्यातून पाच लाख रुपये आर.टी.जी.एस द्वारे घेवून फिर्यादी यांचा विश्वासघात केला.
याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क. 420, 406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय नामदेव जाधव हे करीत आहेत