रायगड जिल्ह्यात 59 रुग्ण; 3 रुग्णांचा मृत्यू तर 98 कोरोनामुक्त, 8 तालुक्यात नवीन रुग्ण नाही

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात बुधवारी कोरोनाच्या 59 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 3 रुग्ण दगावले आहेत. तर दिवसभरात 98 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
 
आज पनवेल महापालिका हद्दीत 34, पनवेल ग्रामीणमध्ये 5, कर्जतमध्ये 3, पेणमध्ये 4, महाडमध्ये 1, खालापूर 8, अलिबाग 3, माणगावमध्ये 1 रुग्णाची नोंद झाली आहे. तर उरण, म्हसळा, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, पोलादपूर, सुधागड, तळा या तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
 
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 70 हजार 320 झाली आहे. यापैकी 1 लाख 65 हजार 074 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 378 वर गेला आहे. सद्यस्थितीत 868 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.”

Exit mobile version