एअर इंडियाचे विमान दिल्लीकडे वळवले
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईहून उड्डाण करणार्या तीन विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. एअर इंडियाचे पहिले विमान मुंबईहून न्यूयॉर्कला जात होते. माहिती मिळताच विमान दिल्लीकडे वळवण्यात आले. हे विमान सध्या दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. विमानात 239 प्रवासी होते. दुसरी फ्लाइट इंडिगोची असून, ती मुंबईहून मस्कतला जात होती. तर तिसरी इंडिगोची फ्लाइट मुंबईहून जेद्दाहला जात होती. या दोन्ही विमानांना विलगीकरणात ठेवून त्यांची तपासणी केली. मुंबई-हावडा मेललाही बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र, तपासणीनंतर गाडी रवाना करण्यात आली. गेल्या पाच दिवसांत विमानात बॉम्बची धमकी देण्याची ही दुसरी घटना आहे. 9 ऑक्टोबर रोजी लंडनहून दिल्लीला येत असलेल्या विस्तारा फ्लाइट 18 मध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती.







