। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील प्रा.शाळा तिसे येथे सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत असणारे उपक्रमशिल शिक्षक सहदेव कापसे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. अविष्कार फाउंडेशन (इंडिया) कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गेली अनेक वर्षे विविध क्षेत्रात तसेच विधायक कार्य करणार्या मान्यवर मंडळींना सदरचे पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. तर उपक्रमशिल शिक्षक सहदेव कापसे यांच्या शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन अविष्कार फाऊण्डेशनतर्फे दीप मिलन बँन्क्वेट हाँल पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांना फाउंडेशनचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर हस्ते उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.