• Login
Monday, May 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Ambenali Ghat Accident: कार दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 25, 2026
in sliderhome, अपघात, पोलादपूर, रायगड
0 0
0
Ambenali Ghat Accident: कार दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू
0
SHARES
82
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रविवारी (दि.24) पहाटेच्या सुमारास दाभिळ टोक या ठिकाणी सुमारे 1000 फुट खोल दरीत एक स्कॉर्पिओ गाडी कोसळून भीषण अपघात घडल्याचे उघडकीस आले. याबाबत रविवारी रात्री माहिती मिळाल्याने रेस्कू करणे धोकादायक असल्याने सोमवारी (दि.24) सकाळी 8.00 वाजण्याच्या सुमारास रेस्क्यूची सुरूवात करण्यात आली. या अपघातात सातारा जिल्ह्यातील 8 तरूण ठार झाल्याची अधिकृत माहिती पोलादपूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक आनंद रावडे यांनी दिली.

पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील दाभिळ टोक हे अनेकदा मृत्यूचे टकमकटोक ठरले आहे. आजपर्यंत या ठिकाणी अनेक भीषण अपघात झाले आहेत. पहिल्यांदा दाभिळ टोक येथे झीटिव्हीचे संचालक झैदी यांची कार कोसळून संपूर्ण झैदी कुटूंब ठार झाले होते. त्यानंतर याच ठिकाणी डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाची बस कोसळली होती. या अपघातात एक व्यक्ती वगळता बसमधील संपूर्ण 30 प्रवासी कर्मचारी ठार झाले होते. आणि आता त्याच ठिकाणी स्कॉर्पिओ गाडी कोसळून आठ जण ठार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.24) सातारा जिल्ह्यातील 8 तरूण दापोलीतील करदे समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. ते रविवारी पहाटे मौजमजा करून परतत असताना त्यातील एकाही तरुणासोबत मोबाईलद्वारे संपर्क होत नसल्याने याबाबत नातेवाईकांनी सातारा पोलीसांकडे संपर्क साधला. त्यावेळी त्यांचे शेवटचे लोकेशन आंबेनळी घाटातील दाभिळटोक येथे आढळून आले. त्यानंतर रात्री 10.00 वाजण्याच्या सुमारास याठिकाणी दरीच्या दिशेचे क्रॅश बॅरियर्स एका ठिकाणी तुटल्याचे, तसेच एका धक्क्यावर टायरमार्क्स दिसून आल्याने अपघाताचा सुगावा लागला. त्यानंतर पोलादपूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक आनंद रावडे, तहसिलदार कपिल घोरपडे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परंतु, रात्रीच्या काळोखात कोसळलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा आणि प्रवाशांच्या मृतदेहांचा शोध घेणे अशक्य होते. त्यामुळे सोमवारी सकाळी रेस्क्यूची सुरूवात करण्यात आली.

यावेळी पोलादपूर पोलीस, महामार्ग वाहतूक पोलीस, पोलादपूर तहसीलदार व कर्मचारी, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रॅकर्स आणि सी-स्केप-महाडचे रेस्क्यू टिमचे जवानांनी दोरखंडाच्या साहाय्याने दरीत उतरून रेस्क्यू सुरू केले. दरी खूपच खोल असल्याने प्रशासनाने ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने खोल दरीत काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीचा शोध लावला. ही गाडी टप्पे खात आदळत आपटत खोल दरीत स्थिरावली होती. या गाडीचा रंग काळा असून, अनेक ठिकाणी जळल्यासारखा तांबडा पत्रा दिसून आला. त्यामुळे दरीत कोसळल्यानंतर गाडीने पेट घेतल्याची शक्यता वर्तविली जात आहे. रेस्क्यू दरम्यान ज्या-ज्या ठिकाणी स्कॉर्पिओ गाडी आदळत दरीमध्ये गेली; त्या-त्या ठिकाणी एकेका व्यक्तीचे मृतदेह आढळून आले. यावेळी स्कॉर्पिओ गाडीतील तरूणांची संख्या 8 असल्याचे आढळून आल्याने मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. यावेळी रूग्णवाहिका आणि अन्य शासकीय वाहनांसह रेस्क्यूटिमचे प्रमुख सागर दहिर्वेकर यांनीही अपघातस्थळी पोहोचून रेस्क्यू टिमच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली. त्यानंतर पहिला मृतदेह केवळ तासाभरातच दरीबाहेर काढण्यात रेस्क्यू टिमला यश आले.

दरम्यान, आंबेनळी घाटातील अपघातप्रवण क्षेत्रातून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांची दाटी वाढून बघ्यांची गर्दी वाढू नये यासाठी अपघातस्थळी पोलादपूर पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता. सोमवारी दुपारनंतर सर्व रेस्क्यूटीमचे सदस्य, पोलादपूर पोलीस, प्रशासन तसेच रूग्णवाहिका कर्मचारी यांनी सर्व 8 जणांचे मृतदेह दरीतून बाहेर काढून ग्रामीण रूग्णालयामध्ये शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले. त्यानंतर उपनिरिक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रूग्णालयामध्ये मृतांच्या नातेवाईकांना तसेच मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीकामी डॉक्टरांना तातडीने सहकार्य करण्याची भूमिका बजावण्यात आली.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
आंबेनळी घाटातील दाभिळटोक येथील अपघातप्रवण क्षेत्रातील दरीच्या बाजूला तकलादू स्वरूपाच्या क्रॅश बॅरियर्सचा वापर करून तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी तीव्र वळणानंतर सरळ घाटरस्ता आणि पुन्हा वळण असा रस्ता आहे. त्यामुळे वाहन वळल्यानंतर दरीच्या बाजूला झोक जाऊन अथवा नियंत्रण सुटून थेट तकलादू क्रॅश बॅरियर्सला धडकून दरीत झेपावण्याची शक्यता निर्माण होते. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटकडून याठिकाणी डोंगर फोडून रस्ता रूंदीकरण करण्यासोबत अपघातप्रवण क्षेत्राची तीव्रता कमी करण्याची आवश्यकता आहे. परिणामी, स्कॉपिओ (एमएच-11-डीएम-2340) या गाडीचा चालक संदीप काटकर (35) याला तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून संरक्षक कठड्याला धडकून 1200 ते 1500 फूट दरीत कासळल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आसगाव, मरडे आणि आझादपूर दु:खात
आंबेनळी घाटात कोसळलेल्या स्कॉर्पिओतील सर्वजण साताऱ्यातील रहिवासी होती. गाडीचा चालक संदीप काटकर (35) आझादपूर येथील रहिवासी होता. तर, आसगावचा अंश समीर चव्हाण हा अवघ्या 18 वर्षांचा होता. याव्यतिरिक्त महेश अनिल पवार (25), आदित्य अशोक साळुंखे (21), रितेश राजेंद्र लोखंडे (25) व सुहास जितेंद्र लोखंडे (20) हे चौघे तरूणदेखील आसगाव येथील रहिवासी होते. तर, उत्कर्ष आनंदा शिंगटे (21) आणि निखिल अभिमन्यू शिंगटे (25) हे दोघे मरडे गावातील रहिवासी होते. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील आसगाव, मरडे आणि आझादपूर या तिन्ही गावांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे.

Related

Tags: accident newsAmbenali Ghat AccidentEight killed after car plunges into gorge.indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoladapur newspoladapur policeraigadsocial media newssocial news
Previous Post

Land Scam: आदिवासींच्या जमिनीवर डल्ला?

Next Post

मुंबई-आग्रा महामार्गावर तिहेरी अपघात; सहा जणांचा मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

शेवटच्या दिवशी जंजिरा फुल्ल
मुरुड

शेवटच्या दिवशी जंजिरा फुल्ल

May 25, 2026
शिवकर इंग्लीश मिडीयम प्रकरण तापले
अलिबाग

शिवकर इंग्लीश मिडीयम प्रकरण तापले

May 25, 2026
Jaljeevan Yojana: निधीअभावी जलजीवन योजना रखडली
उरण

Jaljeevan Yojana: निधीअभावी जलजीवन योजना रखडली

May 25, 2026
अनुराज ठाकूरची खो-खो संघात निवड
क्रीडा

अनुराज ठाकूरची खो-खो संघात निवड

May 25, 2026
पेट्रोल बॉम्बस्फोटातील आरोपीला अटक
sliderhome

आमदाराचा कार्यकर्ता सुधीर चेरकरची गुंडगिरी

May 25, 2026
पेट्रोल, डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी महागणार
sliderhome

Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

May 25, 2026
Next Post
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

मुंबई-आग्रा महामार्गावर तिहेरी अपघात; सहा जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?