। पनवेल । वार्ताहर ।
दक्षिण आफ्रिका व नायजेरीया येथून नवी मुंबईत आलेल्या दोघांना देखील ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील एक व्यक्ती नेरुळमध्ये तर दुसरा व्यक्ती घणसोलीत राहण्यास आहे. त्यामुळे नवी मुंबईतील ओमीक्रॉनच्या रुग्णांची संख्या 4 वर पोहोचली आहे. महापालिकेने या दोघांची आरटीपीसीआर चाचणी करुन त्यांच्या स्वॅबचे नमुने ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी पाठवून दिले होते. ते रहात असलेल्या घणसोली व नेरुळ येथील घर व इमारत सिल केले आहे.