| नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे पोलिस ठाण्याच्या पथकाने वाघ्रनवाडी येथील डोंगराळ भागातील गावठी हातभट्टीच्या दुकानावर कारवाई करत 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. नागोठणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई शनिवारी (ता. 20) दुपारी करण्यात आली. दारू आणि मुद्देमालाची वाहतूक करून आणणे कठीण असल्याने तो जागेवरच नष्ट करण्यात आला. यामध्ये 1500 लिटर नवसागरमिश्रीत तयार रसायने आणि सहा पत्र्याचे ड्रम आणि एक प्लास्टिक कॅनचा समावेश आहे.







